सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांची दिवाळी होणार गोड

बारामती, 13 सप्टेंबरः यंदा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद आणि कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीनिमित्त सोमेश्वर कारखान्याकडून सभासद आणि कामगारांना साखर वाटपची सुरुवात ही 15 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक यादव यांनी सांगितली.

निरा नदीचा विसर्ग केला बंद

दरवर्षी दिवाळी सणात कारखान्याकडून साखरचे वाटप करण्यात येते. ही साखर घेण्यासाठी सभासद आणि कामगारांची मोठी गर्दी दिसते. दिवाळी हा सण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात येत आहे. यामुळे दिवाळीची साखर नेताना गर्दी टाळण्यासाठी यंदा लवकरच साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सवलतीच्या दराने सभासदांना प्रतिकार्ड 30 किलो, तर कामगारांना प्रतिकार्ड 10 किलो साखर 15 रुपये दराने उपलब्ध होणार आहे.

सदर दिवाळीची साखर 31 डिसेंबर 2022 च्या अखेर घेऊन जावे; अन्यथा मुदतीनंतर ती साखर दिली जाणार नाही, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनेकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *