मुंबई, 25 सप्टेंबरः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. या पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यासह वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचेही पालकमंत्री असतील. तसेच या जिल्ह्यांची नियोजन मंत्री म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात ‘युवक महोत्सवा’चे आयोजन
इतर जिल्ह्यांची पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
– चंद्रकांत पाटील- पुणे
– राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर आणि सोलापूर
– सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर आणि गोंदिया
– विजयकुमार गावित- नंदुरबार
– गिरीश महाजन- धुळे, लातूर आणि नांदेड
– गुलाबराव पाटील – बुलढाणा आणि जळगाव
– दादा भुसे- नाशिक
– संजय राठोड- यवतमाळ आणि वाशिम
– सुरेश खाडे- सांगली
– संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
– उदय सामंत- रत्नागिरी आणि रायगड
– तानाजी सावंत- परभणी आणि उस्मानाबाद (धाराशिव)
– रवींद्र चव्हाण- पालघर आणि सिंधुदुर्ग
– अब्दुल सत्तार- हिंगोली
– दीपक केसरकर -मुंबई शहर आणि कोल्हापूर
– अतुल सावे – जालना आणि बीड
– शंभूराज देसाई – सातारा आणि ठाणे
– मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर