बारामतीत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न

बारामती, 16 डिसेंबरः बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने आज, 16 डिसेंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय मैदानी खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन तहसिलदार विजय पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी केले.

वैयक्तिक शेत तळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

यावेळी बारामती तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, आंबेगावचे आमसिध्द सोळनकर, दौंडचे महेश चावले, डॉ. गौतम जाधव, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे आदी उपस्थित होते.

निवडणुकांसंदर्भात प्राधिकृत अधिकाऱ्यांचे उमेदवारांना आवाहन

या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील 14, 17 आणि 19 वयोगटातील मुले व मुलींच्या संघांनी सहभाग नोंदवला. यात लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, धावणे, 400 मी. रिले आणि भाला फेक स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

One Comment on “बारामतीत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *