बारामती, 11 ऑक्टोबरः संपुर्ण जगाला शांततेचा आणि बंधुभावाचा संदेश देणारे प्रेषित महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहरात मोठ्या दिमाखात जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र सणा निमित्त बारामती शहरात 9 ऑक्टोबर 2022 रोजी मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांसह लहान मुलांचाही मोठा सहभाग होता.
बारामतीत हजरत महंमद पैगंबर जयंती उत्साहात साजरी
बारामती शहरातील जामा मशीद येथे बाबा शेख मित्र परिवार तर्फे एसके चिकन शॉप तर्फे तब्बल 1500 मुस्लिम बांधवांना पाण्याची बाटली, फ्रुटी आणि बिस्कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी बाबा शेख मित्र परिवाराचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.