बारामती, 29 जूनः बारामती शहरात रात्रीच्या मुक्कामानंतर आज, बुधवारी (29 जून) सकाळी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानबा-तुकारामाच्या जयघोषात पुढील मोतीबागेच्या दिशेकडे निघाली. सकाळी संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी बारामती शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, बारामती शहरातील तिन-हत्ती चौकात पै. सार्थक फौंडेशनच्या वतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. बारामती शहरात पै. सार्थक फौंडेशन म. राज्य व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन सिद्धार्थ गिते यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारले होते. यावेळी पै. सार्थक फौंडेशनकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, चहा, फळे, पाणी यासह इतर सेवा पुरवण्यात आल्या.
या पालखी सोहळ्यात पै. सार्थक फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पै. गणेश आटपडकर, उपाध्यक्ष पै. तात्यासाहेब राणे यासह अमोल कुलट, डॉ. अक्षय कर्चे, धिरज सकट, नवनाथ कर्चे, प्रकाश कर्चे तसेच फौंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.