बारामती, 29 जूनः बारामती शहरात रात्रीच्या मुक्कामानंतर आज, बुधवारी (29 जून) सकाळी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानबा-तुकारामाच्या जयघोषात पुढील मार्गाकडे प्रस्थान केले. सकाळी संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी बारामती शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, बारामती शहरातील भिमनगर हौसिंग सोसायटीमधील सचिन शिंदे मित्र परिवारच्या वतीने वारकऱ्यांना चहा आणि नाश्ताचे वाटप करण्यात आले. तब्बल
200 लिटर चहा वाटप केल्याचे सामाजित कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी सांगितले. गेल्या 10 वर्षे हा उपक्रम सुरु असल्याची माहिती सचिन शिंदे यांनी सांगितली. या प्रसंगी त्यांचे सहायक आशिष भोसले, छोटू बगाडे, आदित्य कांबळे, रोहित सोनवणे, प्रणय गायकवाड आदींनी मोलाची मदत केली.