बारामती, 7 ऑक्टोबरः बारामती शहरातील शारदा प्रांगण येथे नुकताच पै. सार्थक फौंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचा 8 वा वर्धापण दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त तब्बल 2 हजार गरजू शालेय विद्यार्थ्यांना तब्बल 5 हजार वह्या, 3 हजार पेन आणि खाऊचे वाटप करण्यात आले. सदर शालेय साहित्याचे वाटप विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 5, शाळा क्रमांक 6, शाळा क्रमांक 7, शाळा क्रमांक 8 तसेच उर्दू शाळा आणि मिशन हायस्कूल आदी शाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात आले.
मोरगावात राजेशाही दसरा उत्साहात साजरा
गेल्या आठ वर्षांपासून बारामती सह आसपासच्या परिसरात पै. सार्थक फौंडेशन म. राज्य ही सामाजिक संघटना विविध सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटत आली आहे. या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रासह सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योग-व्यवसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पै. सार्थक फौंडेशनला शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पै. गणेश आटपडकर, अमोल कुलट, डॉ. अक्षय करचे, धीरज सकट, अमित करचे, अवधूत करचे, योगेश महाडिक, शुभम पडकर, तात्यासाहेब राणे, सेवक अहिवळे, सुनिल लोणारी, कैलास करचे, अशोक गायकवाड, विश्वासराव लोंढे, फिरोज बागवान, संतोष कांबळे, साहिल सय्यद, नवा कुचेकर, अक्षय जाधव, तुषार लोणारी, चैतन करचे आदीने कार्य केले.