बारामती, 20 नोव्हेंबरः वाढदिवसाचा अपव्यय खर्च टाळून तरूणाने व मैत्री प्रतिष्ठान ट्रस्टने नविन आदर्श निर्माण केला आहे. बारामती येथील तरुणाने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप केले.
जिल्ह्यात वीज चोरांविरोधात महावितरण आक्रमक
निलेश काळे असे या तरूणाचे नाव आहे. निलेशचा वाढदिवास 17 नोव्हेंबर रोजी होता. त्याने व त्याचा मित्र पृथ्वीराज बांदल या दोघांनी मिळून 2018 साली मैत्री प्रतिष्ठान ट्रस्ट या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्य करत असतात.
ट्रस्टचे प्रमुख पृथ्वीराज बांदल व निलेश काळे यांनी आपल्या मित्रांना ही संकल्पना सांगितली. मित्रांनी देखील सहकार्य करण्यास तयार झाले. वाढदिवसानिमित्त बारामती येथील ख्रिश्चन आश्रमात केक कापून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले.
पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर ‘माफीवीर’चे बॅनर
यावेळी पृथ्वीराज बांदल, तेजस ढवळे, ओमकार ढवळे, प्रथमेश जगताप, चेतन काकडे, हर्षवर्धन जगताप, यश जगताप, आदित्य धोत्रे, सुबोध सुर्यवंशी, कुणाल इथापे, विकी पालवे, सुरज वणवे, निखिल शितोळे, आशुतोष धायगुडे, भूषण काटे, तेजस शेरकर, निखिल कदम, स्वप्निल कदम, संदेश आटोळे यासह इतर मित्र परिवार उपस्थित होते.
One Comment on “आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”