मुदतीत कर भरलेल्या नागरिकांना बक्षिसांचे वितरण

पुणे, 21 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) पुणे महानगरपालिका क्षेत्रात सन 2023-24 या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांसाठी लॉटरी योजना राबविण्यात आली होती. या लॉटरी योजनेतील विजेत्यांना आज (दि.21) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम पुण्यातील सीओईपी विद्यापीठ मैदानावर पार पडला. दरम्यान, नागरिकांनी दिलेल्या वेळेत मिळकत कर भरावा यासाठी एकूण 1.45 कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येत आहेत.

राज्यातील सीईटी परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध

या योजनेमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 6 लाख 60 हजार 785 नागरिकांनी वेळेत कर भरला आहे. त्यामुळे मिळकत करांमध्ये गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत तब्बल 300 कोटींहून अधिक रुपयांची वाढ झाली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, “शहराचा विकास करण्यासोबत शहर सुंदर आणि हिरवेगार रहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. आगामी 50 वर्षाचा शहराचा विचार करून याठिकाणी विकासकामे केली जात आहेत. नियोजनबद्ध विकास करून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध प्रकारचे प्रकल्प सध्या राबविण्यात येत आहेत. शहरातील मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा पहिला टप्पा 9 किमी क्षेत्रात सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना नदीच्या दोन्ही तटावर फिरताना कसलीही अडचण येणार नाही.

इस्रोने रचला इतिहास, गगनयानची पहिली चाचणी यशस्वी

तसेच या नदी परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी नागरिकांनी ही आम्हाला प्रतिसाद द्यावा”, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त आणि विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

One Comment on “मुदतीत कर भरलेल्या नागरिकांना बक्षिसांचे वितरण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *