मोफत फिरता दवाखाना अंतर्गत 3000 वारकऱ्यांना औषधींचे वाटप

बारामती, 28 जूनः कै.रामचंद्र भिसे (गुरुजी) वैद्यकीय प्रतिष्ठान बारामतीच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी श्रीमती सोनिया राजीव गांधी मोफत फिरता दवाखाना ही सुविद्या उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे ते वरवंड पालखी मार्गावर तब्बल 3000 वारकऱ्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर ज्ञानेश्वर सेवा समिती अकोला (विदर्भ) या सेवाभावी संस्थेसही औषधींची मदत करण्यात आल्याची माहिती डॉ. विजय भिसे यांनी दिली.

यासह हॅण्डवॉश व सॅनिटायझरचेही वाटप वारकऱ्यांना करण्यात आले. बारामती येथील लोढा डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडून हॅण्डवॉश व सॅनिटायझर उपलब्ध करण्यात आली होती. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पालखी मार्गावर रांगोळी काढून सेवा करणाऱ्यांंनासह, वारकऱ्यांची चरणसेवा करणाऱ्यां मेटारोल या कंपनीच्या युवकांनाही हॅण्डवॉश व सॅनिटयझरचे वाटप करण्यात आले.

कै.रामचंद्र भिसे(गुरुजी)वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वारकरी सेवा उपक्रमाचे हे 22 वे वर्ष असल्याचे डॉ.विजय भिसे यांनी सांगितले. यावेळी डॉ.भिसे यांच्यासह राजेंद्र गायकवाड ही सहभागी झाले होते. पुढील वारीच्य प्रवासात पालखी मार्गावर डॉ.अप्पा आटोळे व डॉ.योगेश पाटील हे सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. भिसे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *