बारामती, 26 जुलैः बारामतीमधील गिरीराज हॉस्पिटलमध्ये 24 जुलै रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम पार पडला. या उपक्रमाअंतर्गत गरीब गरजू लोकांना श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले. यासह शाहीन सोहेल शेख यांनी अत्याधुनिक अमेरिकन ईसीजी मशीनचे वाटप केले. हे वाटप आमदार अमोल मिटकरी, गिरीराज हॉस्पिटलचे संचालक डॉ. रमेश भोईटे, किरण गुजर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर मोहीमेद्वार गरजू गरीब रुग्णांना मोफडॉत ईसीजी कायम काढून मिळणार आहे.
या ईसीजी मशीनचे वैशिष्ट्ये म्हणजे ही मशीन इतकी छोटी आहे की ती सहजरिज्या खिशात बसेल. मात्र त्याचे काम जीवन वाचवण्याकरीता उपयुक्त आहे. हे ईसीजी मशीन विज्ञान क्षेत्राचे भविष्य असल्याचे प्रतिपादन डॉ. रमेश भोईटे यांनी सांगितले. सदर उपक्रमाला किरण गुजर यांच्या कल्पनेतून झाली असून ही मशीन इम्पोर्ट करण्यासाठीही त्यांचे बहुमूल्य योगदान लाभले. सदर मशीन किरण गुजर यांनी स्वतः वापरून त्याचे रिपोर्ट क्रोस चेक केले. यानंतर डॉ. भोईटे यांनी वेगवेगळ्या रुग्णांवर हे टेस्ट केले. तसेच मोफत ईसीजी आणि बायपास कॅम्प घेण्याकरिता एक संधी सोहेल शेख यांना करुन दिल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात दिली.
पोलीस केंद्र, आरोग्य केंद्र, नगरपरिषद वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचे / कर्मचारींचे अनेकांचे प्राण या ईसीजी मशीन द्वारे आपण वाचू शकतो, असे शाहीन शेख यांनी यावेळी सांगितली. ही सर्व प्रेरणा किरण गुजर यांची होती. आपल्या भागातल्या गरीब जनतेला मोफत ईसीजी टेस्ट आणि श्रावणयंत्र मिळावे, अशी इच्छा त्यांची असल्याचेही शाहीन शेख यांनी बोलून दाखवल्या.
सदर कार्यक्रमाला चेअरमन धनंजय जामदार, माजी क्रिकेट पट्टू धीरज जाधव, महाराष्ट्र क्रिकेट कर्णधार रवींद्र जगदाळे, सुनीता शहा, अनिता गायकवाड, सुनीता मोटे, नलिनी पवार, वैशाली जगताप, द्वारका कारंडे, ज्योती जाधव, तैनूर शेख, अशोक सोनवणे, शहानूर शेख, कैश शेख, अमीर शेख, प्रशांत भोसले आधी उपस्थित होते.