जळगाव सुपे, 30 जूनः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने सचिन खोमणे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीला प्रथोमपचार पेटी देखील भेट स्वरुपात देण्यात आली.
मुंबई येथील मंत्रालयात उच्च पदावर काम करत असलेले जळगाव सुपेचे सुपुत्र सचिन खोमणे यांच्या वाढदिवसानिमित्त उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने सचिन खोमणे यांच्या मातोश्री रुक्मीणी प्रदिप खोमणे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ जगताप यांनी सचिन खोमणे यांच्या निवास स्थानावरील अंगणवाडी (सावकार वस्ती) मध्ये केक कापला. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करून लहान मुलांसाठी प्रथोमपचार पेटी व सॅनिटायझर आदी साहित्य उज्वल आरोग्य सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आले.
आषाढी एकादशीनिमित्त राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुलचा पालखी सोहळा संपन्न
सचिन खोमणे हे गरीब कुटुंबातील सदस्य असून त्यांनी बिकट अवस्थेत शिक्षण घेत आज ते या उंचीवर काम करत असले, तरी समाजातील कामे ते मन लावून करत असतात, अशी माहिती जगन्नाथ जगताप यांनी याप्रसंगी सांगितली.
सचिन खोमणे यांच्या मातोश्री रुक्मीणी खोमणे यांनी सचिनला शिक्षणाची आवड असल्याने आताही तो शिक्षणात हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो, असे सांगितले. तसेच मुलाने लहानपणी काढलेल्या दिवसांच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या.
बानपच्या नगर रचनाकार पदी रमेशकुमार आवताडे यांची नियुक्ती
या कार्यक्रमासाठी उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जगन्नाथ जगताप, सचिन खोमणे यांच्या मातोश्री रुक्मीणी खोमणे, ग्रामपंचायत सदस्या संगिता खोमणे, आरोग्य सेविका शर्मिला जगताप, शैला खोमणे, अलका खोमणे, विशाखा हडगळे, अंगणवाडी सेविका अरुणा खोमणे, सुयश जगताप, अंगणवाडीतील चिमुकले तसेच माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
One Comment on “वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप”