बारामती, 26 ऑक्टोबरः सगळीकडे दिपावलीची धामधूम सुरू आहे. मात्र अनेक गावात अशी काही कुटंब आहेत, ज्यांना आपल्या अर्धिक परिस्थितीमुळे दिवाळी सण साजरा करता येत नाही. त्यांच्या मुलांना फटाके वाजवता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे तसेच बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी बारामती तालुक्यातील सुपे गावातील पारधी समाजातील कुटूंबाना दिवाळीनिमित्त 25 ऑक्टोबर 2022 रोजी मिठाई वाटप केले.
बारामती महिला रुग्णालयात साहित्यांची चोरीला
तसेच यावेळी पारधी समाजातील लहान मुलांना फटाके वाटप करण्यात आले. मिठाई आणि फटाके वाटप केल्यानंतर या समाजातील महिला तसेच लहान मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रत्येकाने माणुसकीच्या नात्याने या दिपावली निमित्त गरीब आणि गरजू लोकांना मदत केली तरच हा दिपावली सण खऱ्या अर्थाने सार्थकी ठरेल, असे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे यांनी मत व्यक्त केले. यावेळी नवनाथ चांदगुडे, दशरथ चांदगुडे, मनोज कदम, राजकुमार लव्हे तसेच पत्रकार सचिन पवार उपस्थित होते.
One Comment on “सुप्यात वंचितांना दिवाळी फराळ वाटप”