मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना डेस्क बॅगचे वाटप

मुंबई, 28 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी मधून अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना डेस्क बॅग वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी पार पडला. या उपक्रमांतर्गत अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या 4000 विद्यार्थ्यांना डेस्क बॅग देण्यात येणार आहेत. त्यातील काही विद्यार्थी विद्यार्थिनींना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात या डेस्क बॅग देण्यात आल्या. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

https://twitter.com/mieknathshinde/status/1762745727535768029?s=19



दरम्यान, या डेस्क बॅग एसबीआय कॅपस आणि निऑन लॅबोरेटरीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या गरीब विद्यार्थी विद्यार्थिनींना देण्यात आल्या आहेत. या डेस्क बॅग वजनाने अगदी हलक्या असून, स्कूल बॅगबरोबरच फोल्डिंग डेस्कची देखील सुविधा त्यात आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी पोषक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले. तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी एसबीआय कॅपस आणि निऑन लॅबोरेटरी या दोन्ही कंपन्यांचे आणि त्यासाठी सहकार्य करणाऱ्या सहकार देवगिरी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे आभार मानले.



याप्रसंगी, मुख्यमंत्री जनकल्याण कशाचे प्रमुख डॉ.अमोल शिंदे, एसबीआय कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र बन्सल, कृष्णन कुट्टी, रोशन नेगी, सहकार देवगिरीचे फाऊन्डेशनचे संचालक राजेंद्र जोशी, अनंत अंतरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *