बारामती, 8 जुलैः बारामती शहरातील एक्सलेन्स सायन्स अकॅडमीचा 9 वा वर्धापन दिन 7 जुलै 2022 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना ॲकॅडमीचे प्राचार्य खोत सरांच्या मार्गदर्शनाखाली महापुरुषांची पुस्तके दिली. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, आण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लाल बहादुर शास्त्री, डॉ. ऐपीजे अब्दुल कलाम, विनोबा भावे, अभ्यास कसा करावा? रविंद्रनाथ टागोर, डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वामी विवेकानंद अशा थोर महापुरुषांची पुस्तके भेट देण्यात आली.

यावेळी बोलताना गौरव गुंदेचा यांनी सांगितले की, खरचं आज आगळ्यावेगळ्या प्रकारे हा कार्यक्रम घेण्यात आला आहे, ज्याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात नक्कीच फायदा होईल आणि त्याचे समाधान आम्हास नक्कीच राहिल. गेल्या 9 वर्षात आपण आम्हावर दाखविलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल आभार मानले.
बारामती नगर परिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सदर कार्यक्रमासाठी दैनिक सकाळ पेपरचे विभाग प्रमुख केळकर सर, स्पर्धा परिक्षा तज्ञ शेखर हुलगे सर, शेतकरी योद्धाचे योगेश नालंदे, तर डॉ. नवनाथ मलगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
बानप शिक्षण विभागाला प्रशासकीय अधिकारी भेटेल का?
Related