गुढीपाढवा आणि जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप

बारामती, 9 एप्रिलः (प्रतिनिधी- शरद भगत) गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बारामती तालुक्यातील मुर्टी येथे आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. राज्य सरकारने संपुर्ण राज्यात गुढीपाढवा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप देण्यात आला. काही गावांना लवकर तर काही गावांना उशिरा हा शिधा मिळत आहे.

महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे अनेक कुटुंबे वंचित

मुर्टी गावात भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस बाळासाहेब बालगुडे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. आनंदाचा शिधा वाटप करताना रेशनदुकानदार अमोल भोसले, कामगार प्रकाश ढंगाणे, राजू शिंदे व पत्रकार शरद भगत उपस्थित होते. आनंदाची शिधा घेताना नागरीकांनी मोदी सरकार आणि शिंदे- फडणवीस सरकारचे आभार मानले.

सुट्टी दिवशीही बारामती नगरपरिषद राहणार सुरु!

One Comment on “गुढीपाढवा आणि जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *