बारामती, 15 एप्रिलः बारामती शहरात मोठ्या उत्साहात 14 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती पार पडली. जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात छोट्या मोठ्या स्वरुपात कार्यक्रम घेत जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
सालाबादाप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, भगवान गौतम बुद्ध महापुरुषांची जयंती मिरवणूक शहरातून काढण्यात आली. बारामती शहरातील सिद्धार्थनगर बुद्धविहारातून शुक्रवारी, सायंकाळी 6 च्या सुमारास जयंती मिरवणुकीस सुरुवात झाली. जस जशी मिरवणुक पुढे सरकत होती तस तशी मिरवणूक ही मोठी होत गेली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात आंबेडकरी बांधवांसह इतर जाती धर्मातील बांधूही शामील झाले होते.
बारामती प्रशासकीय भवनात नव्या पदांची निर्मिती
या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी शहरातील मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. या स्वागत कक्षातून मिरवणुकीमधून चालणाऱ्या महिला, मुले आणि पुरुषांना पाणी, थंड सरबत, ज्यूस आदींचे वाटप करण्यात आले. गुणवडी चौकातून पेठेकडे जाताना क्रांतिसिंह विश्वनाथ (दादा) गालिंदे चौक प्रतिष्ठानच्या वतीने तब्बल 3000 कोल्डड्रिंक्स ज्यूसचे वाटप करण्यात आले.
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
यावेळी विकास गालिंदे, संदेश गालिंदे, ब्रिजेश गालिंदे, आण्णा गालिंदे, अभय गालिंदे, गणेश गालिंदे, निखिल गालिंदे, सुमित गालिंदे, ओंकार गालिंदे, रोहित गालिंदे, गोकुळ गालिंदे, पार्थ गालिंदे, सार्थक पलंगे, अक्षद गालिंदे, पवन गालिंदे, सोहम इंगुले आदी वाटपावेळी उपस्थित होते.
One Comment on “डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 3000 कोल्डड्रिंक्स ज्यूसचे वाटप”