बारामती, 25 ऑगस्टः बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा नदी पात्रात वीर धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार या विसर्गात बदल होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
माळेगाव साखर कारखान्यांकडून 3100 रुपयांचा दर जाहीर
सध्या निरा नदी पात्रात वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युत गृहातून 350 क्युसेक्स आणि डावा कालवा विद्युत गृहातून 250 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून रात्री (24 ऑगस्ट) 13911 क्युसेक्स विसर्ग कमी करून 4637 क्युसेक्स इतका सुरु करण्यात आला आहे. सध्या निरा नदीपात्रात एकूण 5237 क्युसेक्स विसर्ग केला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल होऊ शकतो, याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, निरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असा सतर्कतेचा इशाराही धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.