बारामती, 19 सप्टेंबरः बारामतीत कोट्यावधी रुपये खर्च करून शहरासह तालुक्याच्या वैभवात भर पडेल, अशी प्रशासकीय इमारत निर्माण केली आहे. त्यांच्या देखरेखीचा ठेका स्वप्निल जगताप याला दिला होता. परंतु सदर ठेक्याची मुदत संपून किती वर्षे झाली, तरी नवीन ठेकेदाराला ठेका दिलेला नाही.
बारामतीत महिला अत्याचाऱ्यांचे प्रमाण वाढले?
जुना ठेकेदार हा सदर इमारतीमधील एका खोलीमध्ये बेकायदेशीर झेरॉक्स मशीन वापरत आहे. तसेच दैनिक दिवस स्वच्छता करत नाही. कुठलेही स्वच्छतेचे काम करत नसून आर्थिक फायद्याचे काम करताना दिसत आहे. यामध्ये महसूलचे प्रशासकीय प्रमुख प्रांताधिकारी या बेकायदेशीर कामाला साथ देत आहे. याची चौकशी करण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे.
विशाल जगताप हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता असून शासनाचा महसूल बुडत आहे. तरी प्रांताधिकारी याकडे हेतूपुर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. प्रशासनाच्या प्रमुखाचा गलथान कारभार तसेच इमारतीमधील अस्वच्छतेचा फटका सर्व नागरीकांना आणि कर्मचाऱ्यांना बसत आहे. फायदा मात्र बेकायदेशीर ठेकेदार आणि जबरदस्ती अतिक्रमण करणाऱ्या स्वप्निल जगताप याला होत आहे. ही बाब गंभीर असून याकडे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरपीआय (आठवले) चे बारामती शहराध्यक्ष अभिजित कांबळे यांनी दिला आहे.