बारामती, 27 जानेवारीः बारामती शहरासह एमआयडीसी परिसरात गेल्या महिनाभरापासून डिझेल चोरीचे प्रकरण वाढले आहे. याबाबत बारामतीमधील तब्बल 4 पेट्रोल पंपावर लाखो रुपयांचे डिझेल चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर चोर रात्रीच्या सुमारास अथवा पहाटे कॅनमध्ये डिझेल भरून नंबर प्लेट नसलेली चार चाकी गाडी घेऊन ऑनलाइन पेमेंट करण्याच्या बहान्याने डिझेल घेऊन पळून जातात.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला परेडच्या रंगीत तालीमला बडे अधिकारी गैरहजर?
पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अजून गुन्हेगारांचा शोध अद्याप लागलेला नाही. याबाबत मार्केट यार्डचे सचिवांना विचारले असता मार्केट यार्ड पेट्रोल पंपावर डिझेल चोरी झाल्याचा दुजारा दिला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थी आणि कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप
यासह बारामतीमधील प्रतिष्ठित राजकारणाच्या पेट्रोल पंपावर चोरी झाल्याने व चोरीचा तपास न लागल्याने पेट्रोल पंप मालक दस्तावले आहे. या चोरीचा तपास अतिशय गोपनीय पद्धतीने चालू असून याबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात आहे.
One Comment on “बारामतीमध्ये डिझेल चोर सक्रिय”