बारामती, 20 ऑगस्टः बारामती नगर परिषदेसमोर क्रांती दिनी 9 ऑगस्ट 2022 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला मोठं यश आले आहे.
आरपीआयच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामुळे आणि पाठपुराव्यामुळे प्रबुद्धनगर, वडकेनगर, दादासोनगर आदी भागामधील नागरिकांच्या सोयीसाठी जे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेली आहेत, त्याठिकाणी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सदरील ठिकाणी लाईटची व्यवथा करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी 9 ऑगस्ट 2022 रोजी बारामती नगर परिषद समोर आरपीआय (आठवले) गट बारामती शहरच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते.
मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड; 27 मोटारसायकली हस्तगत
याच आंदोलनाची दखल घेत आज, 20 ऑगस्ट 2022 रोजी सदरील ठिकाणी लाईटची जोडणी करण्यात आली आहे. हे आरपीआय (आठवले) बारामती शहरच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आहे. त्यामुळे आंदोलनास उपस्थित असलेल्या आरपीआय (आठवले) गट बारामती शहर आणि तालुक्यातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे यश असल्याचे आरपीआय पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र (पप्पू) सोनवणे यांनी म्हटले आहे.
सदर काम केल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आरपीआयचे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी आभार मानले आहे. तसेच लोकहितासाठी आंदोलन केलेल्या उर्वरित मागण्या देखील लवकरच पूर्ण केल्या जातील, अशी अपेक्षा रविंद्र सोनवणे आणि अभिजीत कांबळे यांनी व्यक्त केली आहे.