बारामती, 23 मार्चः बारामती शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे छुप्या आणि उघड पद्धतीने सर्रास सुरु आहेत. या अवैध धंद्यांवर संबंधित प्रशासनाचाही साथ असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. सदर अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करून ते बंद करावेत, अशा मागणीचे निवेदन दरम्यानच्या काळात 13 मार्च 2023 रोजी प्रबुद्ध युवक संघटनेकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आले होते.
सदर अवैध धंदे हे बारामती शहरातून तसेच तालुक्यातून बंद न झाल्यास प्रबुद्ध युवक संघटना ही धरणे आंदोलन करणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले होते. मात्र 10 दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाने कुठलीच कारवाई न केल्याने प्रबुद्ध युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज, 23 मार्ज 2023 रोजी पोलीस सहाय्यक अधीक्षक कार्यालय, बारामती यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
पैसे दुप्पट करतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई
प्रबुद्ध युवक संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणेः
1) बेकायदा वाळू, खडी, मुरूम, वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व वाहनांवर कारवाई करावी.
2) वाहतुकीच्या अडथळा करणाऱ्या कायम अतिक्रमण केलेले तात्पुरते अतिक्रमण केलेले, अशा हातगाड्या वाहने, दुचाकी, चारचाकी अडथळे दूर करून व त्यांची चौकशी करून कारवाई करावी
3) परवानगी नसताना हॉटेल चालक-मालक देशी विदेशी दारूचे विक्री व पुरवठा करत असलेल्या हॉटेल चालक मालकावर चौकशी करून कारवाई करावी.
4) दुय्यम निबंधक सहकार यांनी सावकार राजकुमार बिरदिचंद वर्मा यांच्यावर कुसुम महावीर पवार यांची फसवणूक करून सावकारी चक्री व्याज लावल्यामुळे त्याच्यावर सावकारीचा गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करावा.
सरकारी कार्यालयांमध्ये चाललेला खाजगीकरणाचा जीआर रद्द करण्यासाठी अॅड. कांचनकन्होजा खरातांचे निवेदन
आदी मागण्यांसाठी आज, गुरुवारी प्रबुद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत कांबळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रबुद्ध युवक संघटनेचे पदाधिकारी आणि महिला सदस्या उपस्थित होत्या.
One Comment on “अवैध धंदे बंद करण्यासाठी बारामतीत धरणे आंदोलन”