मुंबई, 05 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि.05) मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. तसेच यावेळी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, आझाद मैदानावर पार पडलेल्या या भव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान पंतप्रधान मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच अनेक मंत्री, बडे राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्यासह महायुतीचे हजारो कार्यकर्ते या सोहळ्याला हजर होते.
https://x.com/ANI/status/1864642328629285184?t=D0NBeDZ7BKw-Kbb8bYeH1w&s=19
https://x.com/ANI/status/1864645082110153156?t=VpBHefkt3k78Yee1JzJfuw&s=19
https://x.com/ANI/status/1864644256339775500?t=U_F5KfICgfFw1u7rj0n6SA&s=19
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ
दरम्यान, या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे नाव घेतले. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार हे आता सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहेत.
अनेक बडे नेते आणि मान्यवर उपस्थित
या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, निर्मला सीतारामन रामदास आठवले, यांच्यासह एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. तसेच या सोहळ्याला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चंट यांनी देखील हजरी लावली.
https://x.com/ANI/status/1864663513559650614?t=z5VX3RYDr8Xuvrg1pdwcnA&s=19
बॉलिवूड कलाकारांची हजेरी
या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक नामांकित कलाकार उपस्थित होते. यामध्ये अभिनेता सलमान खान, शाहरूख खान, संजय दत्त, अभिनेत्री माधुरी दिक्षित, रणबीर कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल, विद्या बालन, बोनी कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर, श्रद्धा कपूर, वरूण धवन यांच्यासह अनेक बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.