नागपूर, 25 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य सरकारच्या वतीने नागपूरच्या दीक्षाभूमीवर 200 कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनुयायांना ऑनलाईन संदेश दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करणार?
“200 कोटी रुपयांची विकासकामे दीक्षाभूमीवर लवकरच पूर्ण होतील. दीक्षाभूमी व चैत्यभूमीवरील विकास कार्यासाठी राज्य कटिबद्ध आहे. त्याचवेळी ही सर्व कामे जागतिक दर्जाची व गतीने करण्यात येतील. त्यामुळे येथील 22.80 एकर परिसराचा कायापालट केला जाईल,” असे शिंदे यांनी या संदेशात म्हटले आहे. सोबतच त्यांनी या विकासकामांसाठी लगेचच 70 कोटी रुपयांचा निधी देत असल्याची ही माहिती दिली.
पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. “नागपूर हे शहर देशाच्या अतूट श्रध्देचे केंद्र आहे. त्यामुळे कोणत्याही निमंत्रणाशिवाय या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय बाबासाहेबांच्या श्रध्देपोटी एकत्र येत असतो. त्यामुळे या ठिकाणी जी विकासकामे होतील ती भव्यच असणार आहेत. दीक्षाभूमीचा विकास हा माझ्यासाठी भावनिक विषय आहे. दीक्षाभूमी माझ्या मतदार संघात आहे. यापूर्वी मुख्यमंत्री असताना दीक्षाभूमीच्या विकासाचे झपाट्याने काम सुरू झाले होते. त्यामुळे आताची 200 कोटी रुपयांची ही विकासकामे जागतिक दर्जाची असतील. अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दीक्षाभूमीवर जमलेल्या अनुयायांचे आभार मानले. “देश पातळीवर बुद्धिस्ट सर्किट पूर्ण केल्याचा आपल्याला आनंद आहे. तसेच या कार्याला देशभरातून दिल्या गेलेल्या कौतुकाच्या पावती बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.” असे गडकरी यावेळी म्हणाले.
One Comment on “दीक्षाभूमीवर 200 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ”