उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी

बारामती, 07 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सपत्नीक सहभागी झाले. यावेळी अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार हे बारामती ते काटेवाडी पर्यंतचे अंतर पायी चालत वारीत सामील झाले. तत्पूर्वी, अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीला विमानाने आले. त्यानंतर ते बारामती शहरातील मोतीबाग येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी अजित पवार यांनी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी बारामती ते काटेवाडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीमध्ये सहभाग घेतला.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1809825403969646771?s=19

अजित पवार वारीत सामील

या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अजित पवार यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता. यावेळी अजित पवारांनी वारकऱ्यांसोबत विठ्ठल नामाच्या जयघोषात टाळ वाजवून वारकऱ्यांचा उत्साह वाढवला. तसेच त्यांनी वारीमध्ये चालत असताना वारकऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यावेळी वारकऱ्यांनी अजित पवार यांच्यासोबत फोटो देखील काढले. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्यामुळे पालखी सोहळ्यात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

https://x.com/supriya_sule/status/1809651404690137246?s=19

सुप्रिया सुळेंनी घेतले पालखीचे दर्शन

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी बारामती शहरात आगमन झाले. त्यावेळी बारामतीकरांनी पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले. बारामती पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी यावेळी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, योगेंद्र पवार यांच्यासह प्रतिभा पाटील यांनी काल बारामती येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेतले. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचे आज बारामतीहून सणसरकडे प्रस्थान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *