उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

बारामती, 27 जूनः बारामतीचे लाडके आमदार तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबाबतची माहिती अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली आहे.

अजित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ‘काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.’

सध्या राज्यात राजकीय घडामोडी झपट्याने होताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारवर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे मोठे संकट उभे राहिले आहेत. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *