प्रशासकीय भवनचे मुख्य प्रवेशद्वार हे प्रशासकीय भवन निर्माण झाल्यापासून बंद अवस्थेत आहे. सदरील मुख्य गेट हे चालु केल्याने नागरीकांना पाठीमागील दाराने विनाकारण जावे लागत नाही. तसेच बारामती एस.टी. स्टॅड पासून मुख्य गेट हा जवळचा आणि सोपा मार्ग नागरीकांना उपलब्ध होईल. तसेच सदर प्रवेश गेट उघडल्याने समोरील असणाऱ्या अनुसुचित जाती, जमातीतील नागरीकांना रोजगाराचे मोठे दार उघडले जाईल. यामुळे अनेकजण झेरॉक्स, टायपिंग, हॉटेल व इतर प्रकारची दुकाने टाकून आपली आर्थिक प्रगती करतील. तसेच प्रशासन भवनाचे मुख्य गेट उघडल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समोरील रस्त्याची स्वच्छता राहिल.
आदोलनावेळी वंचितचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे, शहर अध्यक्ष जितेंद्र कवडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बारामती शहर अध्यक्ष विनय दामोदरे, सिद्धार्थ सोनवणे, आकाश लांडगे, कृष्णा साळुंके, सिद्धार्थ पवार, कुणाल लांडगे, सागर सरवदे, रितेश कांबळे, मानव उगाडे, कृष्णा क्षीरसागर, प्रशांत सरतापे, मोहन कांबळे यासह महिला, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.