बारामती, 29 एप्रिलः कोरोना काळात गत दोन वर्षापासून शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झालेले सर्वांना बघितले आहेत. कोरोनाचा परिणाम इतर क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे जवळपास सर्व विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर पडल्याचे सध्याचे विदारक चित्र आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासू वृत्ती या कोरोना काळात लोप पावल्याचे दिसत आहे.
कोरोनाचे निर्बंध हटताच सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या असून ऑफलाईन परीक्षा देखील पार पडल्या आहेत. मात्र या झालेल्या ऑफलाईन परीक्षांचा निकाल लवकरच लागणार आहे. मात्र निकाल लागण्याआधीच बारामतीमधील पैसा पिपासू शिक्षण संस्था ह्या फीसाठी डोके वर काढताना दिसत आहेत.
कोरोना काळानंतर शिक्षण संस्थांनी जबरन शुल्क वसुली सुरु केली आहे, अशा शाळा शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक राखून ठेवत आहेत. त्यामुळे पुढील इयत्तेत प्रवेश घेणे विद्यार्थी आणि पालकांना अवघड जात आहे. सध्या अघोषित फी वसुली राबविले जात असून विद्यार्थी व पालकांना वेठीस धरले जात आहे. याबाबत अनेक तक्रारी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या केले असता, प्रशासन शाळा धारजीन असल्याचे समोर येत आहे. अशा शिक्षण संस्थेवर कारवाई करण्यासाठी पालक संघटना आंदोलन करणार आहेत.
कोरोना काळात माणुसकी हरविलेले शिक्षण माफिया सर्वसामान्य पालकांचे लुट करत आहेत. या बाबत बारामतीचे शिक्षणाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त पालकांचे शिस्त मंडळ हे येत्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटून आपली व्यथा मांडणार आहेत.