बारामतीमधील हातभट्टी हद्दपार? रासायनिक दारूच्या विळख्यात तालुका!

बारामती, 11 जानेवारीः बारामती तालुक्यात हातभट्टी हद्दपार होत आहे. हातभट्टीला असणारा खर्च व कष्ट न परवडणारा असे झाले आहे. त्यामुळे त्याची जागा रासायनिक दारूनी घेतलेली आहे.

ओळख पटविण्यासाठी बारामती शहर पोलिसांचे आवाहन!

हातभट्टी दारूच्या एका बॅलरचा खर्च लागणारी मजुरी, गुळ, सरपन, नवसागर, दारू वाहतुकीचा खर्च याची सरासरी किंमत 2200 ते 2400 रुपये येतो. हा येणारा खर्चापेक्षा आता उरुळी कांचन, माळेगाव, पाहुणेवाडी वरून बिना गुळाचा, बिना नवसागर, कसलाही कष्टविना तयार केलेली रासायनिक ठोकीने बारामती शहरासह तालुक्यात विकली जाते.

बारामतीत कृषिक 2023 चे आयोजन

शरीराला अतिशय घातक, मृत्यूला आमंत्रण देणारी ही दारू बारामती शहर तालुक्यात खपवत आहे. बिगर कष्टाचे, नफेखोर लोकांच्या जीवाशी खेळणारी ही दारू बंद करण्याचे आव्हान पोलीस खाते आणि दारूबंदी विभागाकडे आहे. त्यात किती ते यशस्वी होते? त्यामध्ये शंका अशी की, अर्थपूर्ण व्यवहारातून दारूने मृत्यूचे तांडव सुरुच राहणार का?

One Comment on “बारामतीमधील हातभट्टी हद्दपार? रासायनिक दारूच्या विळख्यात तालुका!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *