महसूल खात्याच्या हलगर्जीपणामुळे बारामतीतील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास

बारामती, 21 जानेवारीः(प्रतिनिधी- सम्राट गायकवाड) बारामती तालुक्यातील मौजे पणदरे गावातील पवईमाळ येथील वीट भट्टीमधील वीट भट्टी चालकांवर गाव कामगार तलाठी भरत ओव्हाळ यांनी सदर वीटभट्टीवर धाड टाकले. त्यावर घटनास्थळी गट क्रमांक 339 मधील रामचंद्र कुंभार यांच्या वीटभट्टीवर 80 हजारांची अंदाजे 100 ब्रास माती 1 लाख रुपये किमतीच्या 20 हजारांचा कच्च्या विटा प्रत्येकी 2 लाख किमतीचे दोन ट्रॅक्टर घेऊन आले.

दूध भेसळ रॅकेटचे बारामती कनेक्शन?

सदर ठिकाणी धनंजय कुंभार व नितीन कुंभार हे वीटभट्टी चालवत असल्याचे दिसून आले. तेथे 1 लाख 7 हजार रुपयांची दोनशे ब्रास माती, 1 लाख रुपयांच्या 20 हजार कच्च्या विटा 2 लाख रुपयांचा एक ट्रॅक्टर प्रत्येकी 50 हजार रुपये किमतीचा दोन ट्रॉल्या आढळून आल्या. तसेच गट क्रमांक 314 मध्ये रामचंद्र कुंभार चालवत असलेल्या वीट भट्टीवर ठिकाणी 2 लाख 80 हजार रुपयांनी 350 ब्रास माती 3 लाख रुपयांच्या 60 हजार कच्च्या विटा, 2 लाख रुपयाचा एक ट्रॅक्टर, 3 लाख किमतीचा जेसीबी व प्रत्येकी 50 हजार रुपये किमतीचे दोन ट्रेलर आढळून आले.

खासदार सुप्रिया सुळेंच्या बारामतीत कृषिमंत्री सत्तारांचे आगमन

गाव कामगार तलाठी, मंडलाधिकारी आणि तहसीलदार यांनी खाण व खनिज अधिनियम 1957 व पर्यावरण अधिनियम 1986 नुसार कारवाई केली. परंतु त्यावर क्रिमिनल अपील केस नंबर 499/ 2013 सर्वोच्च न्यायालय यांनी निकाल दिला होता की, “नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास किंवा चोरी करणाऱ्यांवर चोरीचे गुन्हे दाखल करावेत”, असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. मात्र जिल्हाधिकारी यांनी प्रांत अधिकारी यांना आदेश दिले असता माननीय गाव कामगार तलाठी, मंडलाधिकारी व तहसीलदार यांनी हे गुन्हे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यांचा अवमान केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वीट भट्टी माफियांना अभय मिळत आहे. जर असे गुन्हे दाखल झाले तर त्यामुळे परवानगीशिवाय वीट भट्टी तयार होणार नाहीत.

विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे अपघाताचा धोका

3 Comments on “महसूल खात्याच्या हलगर्जीपणामुळे बारामतीतील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *