डेंग्यूने घेतला बारामतीमधील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा बळी

बारामती, 20 सप्टेंबरः बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आज, 20 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे डेंग्यूने बळी घेतल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शितल जगताप-गलांडे असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. शितल जगताप-गलांडे या बारामती शहर पोलीस ठाण्याची संपुर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या.

बारामती शहराला दिवसाआड होणार पाणी पुरवठा

दरम्यान, शितल जगताप- गलांडे यांनी प्रसूती रजेवर गेल्या होत्या. मात्र प्रसुतीनंतर अवघ्या काही दिवसात त्यांना डेंग्यूची लागण झाली. तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र तब्येत आणखीन ढासळल्याने त्यांचं आज, मंगळवारी पहाटे निधन झाले आहे. त्यांच्या पाठीमागे पती एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे.



प्रसूती रजेच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या. पोलीस दलाचे शिस्तप्रिय, जोखमीचे मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या. पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. अशा या हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे अकाली निधन होणे पोलीस दलासाठी न भरून निघणारी उणीव आहे.

त्यांच्या परिवाराच्या दुःखात संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस दल आणि बारामती शहर पोलीस ठाणे सहभागी आहे. शितल जगताप- गलांडे यांच्या निधनानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व संपूर्ण बारामती शहर पोलीस ठाणे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *