माळेगाव पोलीस उपनिरीक्षकाची निलंबनाची मागणी?

माळेगाव, 14 डिसेंबर: बारामती तालुक्यातील माळेगाव गावाला नुकताच नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. माळेगाव साखर कारखाना, माळेगाव आयटीआय आणि इंजिनीयर कॉलेज अशी बरीच शैक्षणिक संकुल माळेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येतात. इथे माळेगाव साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू झाला असून लोकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे माळेगाव शिवनगर येथे दोन नंबर वाल्यांची दिवाळी सुरू आहे. मटका, रासायनिक दारू, हातभट्टी दारू यांचा खुलेआम धंदा चालू असून या बेकायदेशीर धंद्यावाल्यांना हप्ता वाढवण्यात आलाय.

मुख्यमंत्र्यांचे आदेश

पांढरे नामक इसम या दोन नंबर वाल्यांचा व यंत्रणेचा समन्वयक म्हणून काम पाहतोय त्यातून दरमहा लाखोंची खंडणी गोळा करत आहे. ज्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दोन नंबरचे धंदे आढळतील त्या कार्यक्षेत्रातील प्रभारी अधिकाऱ्याला तात्कालीन निलंबित करण्यात यावे, असे आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिले आहेत.

फुग्यातून हातभट्टीची विक्री

महाराष्ट्रातील अनेक जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अशा लेखी स्टँडिंग ऑर्डर प्रत्येक पोलीस स्टेशनला पाठवले आहे असे समजते. माळेगावात काही परिसरात छोटे छोटे फुग्यातून हातभट्टी व रासायनिक दारू विकली जात आहे. शिवनगर परिसरात दुचाकी वाहनावर असे फुगे सर्रास विकले जात असल्याचे आमच्या पत्रकांच्या निदर्शनास आले मटक्याचे एजंट फिरस्ता मटका घेत असून मोबाईल वरती या मटक्याचे आकडे ठरवले जातात. आधुनिक डिजिटल मटक्याचा व्यवसाय हा माळेगाव परिसरात नित्याची बाब झाली आहे दारू मटका फिरस्ताधंदा सुरू आहे एक ठिकाणी बसून धंदा करण्यापेक्षा फिरून धंदा करण्याचे तंत्र या दोन नंबर वाल्यांनी अवगत केले आहे. त्यामुळे या धंद्याचा आर्थिक विकास झालाय समाजामध्ये अनेक तरूणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

अवैध धंद्यामुळे समाज दृष्ट चक्रात अडकलाय

मटक्याचा व दारूच्या धंद्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झाली. यातूनच बेकायदेशीर सावकारी निर्माण झाली आहे. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील समाज या दृष्ट चक्रात अडकला असून पोलीस स्टेशनमध्ये दोन नंबरच्या पाठीराख्यांची राजकीय दलाराम सोबत उठणं बसणं वाढलंय. या दलालखोरांमुळे तडजोडीच्या प्रकरणात रोजची लाखोंची उलाढाल पोलीस परिसरात होत असून दखल पात्र गंभीर गुन्ह्यातील तडजोडी करून आरोपी मोकाट सुटत आहे व गुन्हेगाराला संरक्षण मिळत आहे. याचा परिणाम असा की अल्पवयीन मुलांमध्ये कोयता, कुऱ्हाड, तलवार घेऊन तुंबळ मारामारी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *