बारामती, 9 फेब्रुवारीः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील तरडोली गावात 4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 च्या सुमारास एका दैंनिक पत्रकारावर अवैध गुंठेवारी करणाऱ्या गाव गुंडांनी हल्ला केला. या हल्ल्यात दैंनिक पत्रकार विनोद पवार यांच्यासह त्यांचे वडिलांनाही शिवीगाळ करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदर घटनेनंतर सर्व स्तरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत असून संबंधित संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बारामतीत संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
बारामती तालुक्यातील तरडोली गावातील गट नंबर 523 मध्ये शुक्रवारी 4 फेब्रुवारी रोजी मंगेश जगताप (रा. मुर्टी. ता. बारामती), सागर शिगनारे (रा. पांढेश्वर ता. पुरंदर) यासह इतर अनोळखी चार जणांनी अवैधरित्या गुंठेवारी सुरु केली होती. या विरोध केल्याने पत्रकार विनोद पवार आणि त्यांचे वडील पोपट पवार यांनी शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली.
विविध मागण्यासाठी प्रबुद्ध युवक संघटनेकडून आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलन
या घटनेनंतर संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, यासाठी संजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत यांच्या वतीने वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी, संस्थेचे कार्यकर्ते व एपी क्राईम न्युज लाईव्हचे प्रतिनिधी शकिल इनामदार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र महाडीक आदी उपस्थित होते.
One Comment on “बारामतीत पत्रकार हल्ला प्रकरणी कठोर कारवाईची मागणी”