प्रभू श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी

मुंबई, 04 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1742776173401354633?s=19



दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध करण्यात येत आहे. तर जितेंद्र आव्हाड यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे येत्या काही काळात जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरूद्ध तक्रार दाखल

याप्रकरणी, भाजप नेते राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. “व्हिडीओ फुटेज तपासून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी आम्हाला दिले आहे.” असे राम कदम म्हणाले आहेत. “प्रभू राम यांनी दिलेल्या आदर्शावर चालणारे हे सरकार आहे. या महाराष्ट्राच्या भूमीवर आम्ही कोणालाही देवी-देवतांचा अपमान करू देणार नाही.” असे राम कदम यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1742763508884967659?s=19

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

आव्हाड यांच्या या वक्तव्यावरून राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “त्यांना काय झाले आहे? एकीकडे शरद पवारांचे मौन, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे मौन! आपल्या कुटुंबाला राजकारणात कसे आणायचे याची चिंता उद्धव ठाकरेंना लागली आहे. हिंदू समाजाची वारंवार चेष्टा करा आणि एकाच समाजाला खुश करा, हे विचारपूर्वक केलेले राजकारण आहे,” असे राम कदम म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *