हायकोर्टाच्या निर्णयानंतर उद्याचा महाराष्ट्र बंद मागे; महाविकास आघाडीच्या नेत्यांची घोषणा

मुंबई, 23 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या, दि. 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. विरोधी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने ह्या सुनावणीत महाविकास आघाडीने पुकारलेल्या या बंदला परवानगी दिली नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही. बंद पुकारल्यास त्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

https://x.com/ANI/status/1826965799023898689?s=19

https://x.com/PawarSpeaks/status/1826951982332145780?s=19

शरद पवारांचे ट्विट

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. “बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.” असे शरद पवारांनी म्हटले आहे.

उद्या काँगेसचे निषेध आंदोलन

तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्याचा बंद मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसेच बदलापूरच्या चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या विरोधात उद्या सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध करणार असल्याची घोषणा देखील नाना पटोले यांनी केली आहे. तर नाना पटोले हे उद्या सकाळी 11 वाजता ठाणे येथील आंदोलनात सहभागी होणार आहे.

https://x.com/OfficeofUT/status/1826975110710079851?s=19

उद्धव ठाकरेंनी बंद मागे घेतला

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला परवानगी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उद्याचा बंद मागे घेण्याची घोषणा केली आहे. उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत. परंतू उद्या राज्यभरात विविध ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन या सर्व गोष्टींचा निषेध करतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *