बारामती, 12 ऑक्टोबरः बारामती संपादक पत्रकार सुरक्षा दल यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना 11 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रकारांच्या शिस्त मंडळाकडून निवेदन करण्यात आले. सदर निवेदनात पत्रकारांशी गैरवर्तणूक आणि धमकी देणाऱ्या रिषभ इलेक्ट्रिकल दुकानदार केवल शहा आणि त्यांच्या आईवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.
फळपिक विम्यासाठी बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन
दरम्यान, बारामती येथील रिषभ होलसेल इलेक्ट्रिकल दुकानाचे मालक केवल शहा हे ग्राहकांसोबत वाद घालत होते. या वादाचा प्रसंग मोबाईलमध्ये टिपत असलेल्या संदीप आढाव या पत्रकारास दुकानदाराच्या आईने गचांडी धरली. तसेच पत्रकाराचे ओळखपत्र पाहूनही दुकानातून बाहेर हाकलले. तसेच ‘ तू कोण पत्रकार आहे बघू, मी तुझ्या बापाला देखील घाबरत नाही,’ असे म्हणून पत्रकारासोबत असभ्य वर्तणुक देवून गैरवर्तणूक केली. तसेच जर तू आमच्या विरोधात तक्रार दिली तर जड जाईल, अशी धमकी पत्रकार संदीप आढाव यांना फोन करून दिली.
तहसिलदार पाटील यांचे शिधापत्रिका धारकांना आवाहन
या गैरवर्तणुकी विरोधात बारामती संपादक पत्रकार सुरक्षा दल यांच्या वतीने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी पत्रकार सुरक्षा दलाचे अध्यक्ष योगेश नालंदे, मन्सूर शेख, स्वप्नील कांबळे मराठी पत्रकार संघाचे हेमंत गडकरी, पत्रकार संतोष कांबळे, संजय कांबळे, भारत तुपे, नितिन पवार, दै.पुण्यनगरीचे अमोल यादव, निलेश निकम, गजानन गायकवाड यासह सामाजिक संघटनांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते योगेश महाडिक, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर आदी उपस्थित होते.