दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक! आज कोर्टात हजर करणार

दिल्ली, 22 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. काही तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या पथकाने त्यांना काल अटक केली. त्यांच्या अटकेमुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तर यापूर्वी ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना याप्रकरणी 9 वेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, तरीदेखील केजरीवाल हे ईडीसमोर हजर झाले नव्हते. त्यानंतर काल संध्याकाळी ईडीचे पथक 10 व्या समन्ससह केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले. त्यावेळी चौकशीनंतर ईडीच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांना अटक केली. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या कारवाईविरोधात आम आदमी पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1770839790604222649?s=19

https://twitter.com/ANI/status/1770806160045531551?s=19



दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्ष आज देशभरात आंदोलन करणार आहे. तर ईडी आज केजरीवाल यांना पीएमएलए कोर्टात हजर करणार आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांना 10 दिवसांची कोठडी देण्याची मागणी ईडी करू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात कोर्ट कोणता निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना यापूर्वीच अटक केलेली आहे. तर यापूर्वी केजरीवाल यांना याप्रकरणात ईडीकडून 9 वेळा समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर देखील केजरीवाल यांनी तपासात सहकार्य केले नव्हते. अशा परिस्थितीत ईडीचे पथक दहाव्या समन्ससह काल संध्याकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी चौकशीनंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *