दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू, भाजप आघाडीवर

दिल्ली निवडणूक निकाल 2025 – भाजप, आप आणि काँग्रेस आमनेसामने

दिल्ली, 08 फेब्रुवारी: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे. यात 70 पैकी 45 जागांवर भाजप आघाडीवर असून, आम आदमी पक्ष 25 जागांवर पुढे आहे. काँग्रेसला अद्याप एकही जागा मिळालेली नाही. दरम्यान, हे सुरूवातीचे कल असून, थोड्याच वेळात मतमोजणीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

https://x.com/ANI/status/1888052763684389151?t=yzNrQNzhIdBrhi_L7grjyg&s=19



प्रमुख नेत्यांचे भवितव्य ठरवणारा निकाल

या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, विद्यमान मुख्यमंत्री आतिशी, तसेच मनीष सिसोदिया यांसारख्या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच यामध्ये एकूण 699 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (दि.08) सकाळी 8 वाजता सुरू झाली असून, मतमोजणी



दिल्लीत 60 टक्क्यांहून अधिक मतदान

तत्पूर्वी, विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने 7 फेब्रुवारी रोजी मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर केली होती. या आकडेवारीनुसार दिल्लीत 70 जागांसाठी सरासरी 60.54 टक्के इतके मतदान झाले. यामध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत सर्वाधिक 66.25 टक्के मतदान नोंदवले, तर दक्षिण-पूर्व दिल्लीमध्ये सर्वात कमी 56.40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

भाजप पुनरागमन करणार?

बहुतांश एग्जिट पोलनुसार, 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजप परत येणार असल्याचा अंदाज आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आप चा प्रभाव होता. 2020 मध्ये आप ने 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला फक्त 8 जागांवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत प्राथमिक कलानुसार, भाजप 45 जागा आणि आप 25 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे दिल्लीत भाजप सत्ता स्थापन करणार? की आम आदमी पक्ष? याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *