दिल्ली, 28 जून: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. दिल्लीत झालेल्या पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 चे पार्किंग शेड कोसळले आहे. त्यामुळे खाली उभ्या असलेल्या अनेक कॅब यामध्ये गाडल्या गेल्या. या दुर्घटनेत एका कॅब चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिल्ली विमानतळाला भेट दिली.
https://x.com/AHindinews/status/1806493659774542263?s=19
https://x.com/AHindinews/status/1806548205733298684?s=19
https://x.com/RamMNK/status/1806547202497814747?s=19
विमान वाहतूक मंत्र्यांनी घेतला आढावा
यावेळी त्यांनी दिल्ली विमानतळावरील टर्मिनल-1 ची पाहणी केली. टर्मिनल-1 चे छत कोसळण्याच्या घटनेचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करत आहे. टर्मिनल-1 वर सर्व बाधित प्रवाशांना मदत करण्याचा सल्लाही एअरलाईन्सना दिला. तसेच याठिकाणी बचावकार्य करून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती राम मोहन नायडू यांनी दिल्ली आहे.
अशी घडली घटना
दरम्यान, विमानतळावर ज्या ठिकाणी प्रवाशांना उतरवले जाते, त्या जागेच्या वरतीच हे लोखंडी शेड आहे. कॅब चालक प्रवाशांना पिक-ड्रॉप करण्यासाठी येथे उभा राहत असतात. मात्र त्याचवेळी मुसळधार पावसामुळे हे लोखंडी शेड अचानकपणे खाली कोसळले. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत ही दुर्घटना घडली. त्यामुळे घटनास्थळी मोठी आरडाओरड सुरू झाली. त्यावेळी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, छतावरील पत्र्याव्यतिरिक्त सपोर्ट बीम देखील कोसळला. त्यामुळे अनेक गाड्या त्याखाली सापडल्याने ह्या गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या कॅब चालकाचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.