अज्ञात वाहनेच्या धडकेत हरणाचा मृत्यु

बारामती/मुर्टी, 25 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मोरगाव- निरा रस्त्याच्या जवळच मुर्टी गावच्या हद्दीतील जाधववस्ती नजिक जाधव, सचिन नलवडे व पत्रकार शरद भगत यांनी शेताच्या बांधावरती चिंकारा नर जातीचे मृत हरीण पाहिले. या मृत हरणाची खबर वनविभागाचे वनपाल पाचपुते यांना शरद भगत यांनी सांगितली.

परिवर्तन व्याख्यानमालेतून गावचा विकासाचे गिरवले धडे

वनपाल पाचपुते यांनी त्यांच्या वनसुरक्षक सोमनाथ जाधव यांना फोन करुन घटना स्थळी दाखल होण्यास सांगितले. जाधव यांनी घचनास्थळी आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कारंडे यांना बोलावून घेतले. दोघांनी हरणाला जखम झाली का हे बारकाईने पाहिले. त्यांना हरणाच्या तोंडाला जखम झाल्याचे प्रथमस्थानी निदर्शनास आले. या नंतर हरणाचे शवविच्छेदन करण्यासाठी मोरगाव या ठिकाणी पाठवण्यात आले होते.

निरा- मोरगाव मार्गावरून खडी व गौण खनिजाची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गावडे यांनी शवविच्छेदन करुन लोणी भापकर येथे हरणाचा अंत्यविधी केला असल्याचे वनसंरक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

One Comment on “अज्ञात वाहनेच्या धडकेत हरणाचा मृत्यु”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *