डीपफेक समाजासाठी धोकादायक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विधान

नागपूर, 02 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111 वा दीक्षांत समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हजेरी लावली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले. याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाने दिली आहे. कोणत्याही देशाच्या विकासात संशोधन आणि नवकल्पना महत्त्वाची भूमिका बजावतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे संशोधन, नवनिर्मिती आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देत असल्याचे पाहून आनंद झाल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी म्हटले आहे.

राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

या विद्यापीठातील प्राध्यापकांना भारतीय पेटंट कार्यालयाने 60 हून अधिक पेटंट दिले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये स्टार्ट-अप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठात इनक्युबेशन सेंटर आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांना स्थानिक समस्या आणि गरजा लक्षात घेऊन संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केले. “आज संपूर्ण जग हे एक जागतिक गाव आहे. कोणतीही संस्था जगापासून दूर राहू शकत नाही. संशोधन आणि नवकल्पना एकमेकांशी शेअर करूनच आपण जगासमोरील आव्हानांना तोंड देऊ शकतो”, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच नागपूर विद्यापीठाला आंतर विद्याशाखीय अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमात द्रौपदी मुर्मू यांनी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत भाष्य केले. “कोणत्याही संसाधनाचा वापर किंवा गैरवापर होऊ शकतो. हीच वस्तुस्थिती तंत्रज्ञानाच्या बाबतीतही लागू होते. जर आपण त्याचा योग्य वापर केला तर ते देश आणि समाजासाठी फायदेशीर ठरेल आणि त्याचा गैरवापर केल्यास ते मानवतेसाठी हानिकारक असेल. मात्र डीपफेक आणि त्याचा वापर समाजासाठी धोकादायक आहे. नैतिक शिक्षण आपल्याला मार्ग दाखवू शकते”, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.

20 लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

“औपचारिक पदवी मिळणे म्हणजे शिक्षणाचा शेवट नाही. विद्यार्थ्यांनी उत्सुक राहून शिकत राहिले पाहिजे. आज जेव्हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत, तेव्हा सतत शिकत राहणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. विद्यार्थी हे राष्ट्र आणि समाजाची संपत्ती आहेत. भारताचे भविष्य त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या आयुष्यात प्रतिकूल परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे त्यांनी घाबरून जाऊ नये. त्या परिस्थितीला त्यांच्या ज्ञानाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जावे. तसेच त्यांच्या प्रियजनांशी जोडलेले राहावे आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा”, असा सल्ला यावेळी राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 29 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.

2 Comments on “डीपफेक समाजासाठी धोकादायक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विधान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *