दीपक केसरकरांनी त्या मुलीची जाहीर माफी मागावी- सुप्रिया सुळे

मुंबई, 27 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) शिक्षक भरती संदर्भात माहिती विचारणाऱ्या एका तरूणीला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीरपणे धमकी दिली आहे. दीपक केसरकर यांनी त्या तरूणीला सर्वांसमोर अपात्र करण्याची धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी दीपक केसरकर यांचा हा व्हिडीओ ट्विट केला. तसेच दीपक केसरकर यांनी संबंधित मुलीची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यामुळे दीपक केसरकर हे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अखेर हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये वापसी!

“महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला ‘डिसक्वालिफाय’ करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ असा प्रश्न पडतो. एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहीर माफी मागितली पाहिजे.” असे सुप्रिया सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे काल बीडच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी एका तरूणीने शिक्षक भरतीच्या संदर्भात दीपक केसरकर यांना माहिती विचारली. तसेच या तरूणीने रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया कधी सुरू होणार? असा सवाल दीपक केसरकर यांना केला. त्यावरून केसरकर संतापले आणि त्यांनी “अजिबात मध्ये बोलायचं नाही, नाहीतर तुमचं नाव घेऊन तुम्हाला अपात्र करायला लावेल.” अशी धमकी या तरूणीला सर्वांसमोर दिली आहे. तर दीपक केसरकर यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

One Comment on “दीपक केसरकरांनी त्या मुलीची जाहीर माफी मागावी- सुप्रिया सुळे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *