बंगळुरू, 05 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कर्नाटकातील एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून धमकी दिली आहे. या प्रकारामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद रसूल कद्दरे असे या धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी आरोपीला अटक झालेली नाही. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
Karnataka | An FIR has been registered against Mohammed Rasool Kaddare at Yadgiri's Surpur police station. He shared a video on social media where he threatened to kill PM Modi if the Congress government came to power at the Centre. FIR has been registered under section…
— ANI (@ANI) March 5, 2024
आरोपी विरुद्ध एफआयआर नोंदविला
मोहम्मद रसूल कद्दरे नावाच्या या आरोपीने त्याच्या फेसबूक अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये त्याने पंतप्रधान मोदींना हातात तलवार घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. त्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत. याप्रकरणी मोहम्मद रसूल कद्दरे याच्या विरोधात आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 501(1)(बी), 25(1)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी अद्याप फरार
दरम्यान, मोहम्मद रसूल कद्दरे हा मूळचा कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्याच्या एका गावचा रहिवासी आहे. तो यापूर्वी हैदराबादमध्ये मजूर म्हणून कामाला होता. त्यासाठी तो तिथेच स्थायिक झाला होता. या पार्श्वभूमीवर, पोलीस सध्या हैदराबाद मध्ये देखील त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, देशातील पंतप्रधानांसारख्या व्यक्तीला सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून धमकी देणे ही अतिशय गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर या आरोपीला अटक करण्याची मागणी सध्या केली जात आहे.