मुकेश अंबानी यांना जीवे मरण्याची धमकी

मुंबई, 28 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. तर हे पैसे दिले नाहीत तर आपला जीव गमवावा लागेल, असे या धमकी देणाऱ्याने म्हटले आहे. त्यांना ही धमकी ईमेलच्या माध्यमातून मिळली आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या ईमेल आयडी वर 27 ऑक्टोंबर रोजी हा धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. “तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत,” असे या ईमेल लिहिण्यात आले आहे. याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मुंबईच्या गामदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर याचा सध्या पोलीस करीत आहेत.

पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर!

दरम्यान, मुकेश अंबानी यांना यापूर्वी ही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्याच वर्षी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तेंव्हापासून त्यांची सुरक्षा झेड+ करण्यात आली होती. वर्षी ऑक्टोबरमध्येही एका व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे यांच्या सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल मध्ये फोन करून त्यांचे अँटिलिया घर आणि रुग्णालय उडवून देण्याची धमकी दिली होती. यासोबतच फोन करणाऱ्याने अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती.

रोहित पवारांची युवा संघर्ष पदयात्रा स्थगित

त्यानंतर या वर्षीच्या सुरुवातीला मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये फोन करून ते बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच, फेब्रुवारी 2021 मध्ये स्फोटकांनी भरलेली SUV अंबानी यांच्या अँटिलिया या घराच्या बाहेर उभी करण्यात आली होती. तेंव्हा ही गाडी जप्त करण्यात आली होती. या गाडीत 20 जिलेटिनच्या काठ्या आणि एक पत्र सापडले होते. त्यामध्ये मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

2 Comments on “मुकेश अंबानी यांना जीवे मरण्याची धमकी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *