पुणे, 26 ऑक्टोबरः माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज, 26 ऑक्टोबर 2022 रोजी निधन झाले आहे. निम्हण हे 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते.
गोविंदबागेत कार्यकर्त्यांची तुफान गर्दी!
पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून 1999 साली ते आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेना विभाग प्रमुख, आमदार, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. विनायक निम्हण यांनी दोन वेळा शिवसेनेकडून आणि 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते.
माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या सोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते, त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता.
बारामती महिला रुग्णालयात साहित्यांची चोरीला
त्यांनी 2014 मध्ये पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते. यावेळी त्यांची शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पाषाण स्मशानभूमीत आज, रात्री 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
विनायक निम्हण यांच्या निधन वार्ता समजताच खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. ‘माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. ते अनेक वर्षे पुण्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे निम्हण कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.’, असं ट्वीट सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. ते अनेक वर्षे पुण्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे निम्हण कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/U9ojGvd0mF
— Supriya Sule (@supriya_sule) October 26, 2022
One Comment on “विनायक निम्हण यांचं निधन; सुप्रिया सुळेंकडून श्रद्धांजली”