मुंबई, 25 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याने 140 चेंडूत 174 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 15 चौकार आणि 5 षटकार ठोकले. या सामन्यात त्याला द्विशतक करण्याची चांगली संधी होती. मात्र डी कॉक फटकेबाजी करण्याच्या नादात 174 धावांवर बाद झाला. एकदिवसीय सामन्यातील क्विंटन डी कॉकचे हे 20 वे शतक आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर चालू विश्वचषक स्पर्धेतील डी कॉकचे हे तिसरे शतक आहे.
माजी मुख्यमंत्र्यांचा कार अपघात, थोडक्यात बचावले
त्याने यापूर्वी श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात 100 धावा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 109 धावा केल्या होत्या. याच कामगिरीमुळे क्विंटन डी कॉक हा 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याने या विश्वचषकात खेळलेल्या 5 सामन्यात 81.40 च्या सरासरीने 407 धावा केल्या आहेत. तर या यादीत भारताचा विराट कोहली 354 धावा करीत दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत रोहितने आतापर्यंत 311 धावा केल्या आहेत.
दरम्यान, क्विंटन डी कॉकने बांगलादेश विरुद्ध शतक झळकवल्याने त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. यामध्ये एकाच विश्वचषकात 3 शतके करणारा डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. तर हा विक्रम यापूर्वी एबी डिव्हीलियर्सच्या नावावर होता एबीने 2015 च्या विश्वचषकात 2 शतके झळकावली होती. तसेच एकाच विश्वचषकात सर्वाधिक विक्रम करण्याचा विक्रम भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत 5 शतके ठोकली होती. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेत क्विंटन डी कॉक रोहित शर्माच्या सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडणार का? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
दाजीची मज्या अन् गावकरांना सजा!
One Comment on “वर्ल्डकपमध्ये डी कॉकची बॅट तळपली, पोहोचला अव्वल स्थानी”