दरम्यान, आरक्षण सोडत कार्यक्रमच्या सुरुवातीस नागरिकांना आरक्षण सोडत संदर्भात संजय पाटील यांनी माहिती सांगितली. सुरुवातीला अनुसूचित जाती, त्यानंतर ओबीसी आणि शेवटी सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. यावेळी आरक्षण सोडतीच्या चिठ्ठींसाठी लहान मुलांना प्राचारण करण्यात आले होते. आरक्षण सोडत ही लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने सोडत काढण्यात आले. यानुसार पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी खालील प्रमाणे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे.
यात अनुसूचित जाती- 2 जागा, ओबीसी (नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग)- 4, महिला- 5 जागा, खुला प्रवर्ग (ओपन)- 10 जागा असणार आहेत. यासह गणांनुसार आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. 1) खामगाव- सर्वसाधारण 2) राहू- सर्वसाधारण 3) पिंपळगाव- सर्वसाधारण (महिला) 4) पारगाव- अनुसूचित जाती (महिला) 5) कानगाव- सर्वसाधारण (महिला) 6) गोपाळवाडी- ओबीसी (महिला) 7) लिंगाळी- सर्वसाधारण 8) देऊळगाव राजे- सर्वसाधारण 9) राजेगाव- ओबीसी (पुरुष) 10) खडकी- ओबीसी (महिला) 11) पाटस- सर्वसाधारण 12) कुरकुंभ- सर्वसाधारण (महिला) 13) वरवंड- सर्वसाधारण (महिला) 14) बोरीपार्धी- सर्वसाधारण (महिला) 15) यवत- ओबीसी (पुरुष) 16) बोरीभडक- अनुसूचित जाती (पुरुष)
सदर आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला तहसीलदार तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील, भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंखे, निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे आदी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.