दौंड-बारामती एसटी पुन्हा बंद; प्रवाशांचे हाल

बारामती, 3 ऑगस्टः बारामती तालुक्यातील उंडवडी सुंपे येथे नुकतीच दौंड डेपोची एसटी बस जानाई मळ्यात अचानक बंद पडली. परिणामी प्रवाशांना विनाकारण दुसरी एसटी बस येईपर्यंत ताटकळत रस्त्यावर उभे राहवे लागले. दौंड डेपोच्या एसटी बस या फार जुन्या झाल्या आहेत. यामुळे दौंड डेपोच्या बस वारंवार कोठेही बंद पडत असल्याचे चित्र आहे. या बंद पडणाऱ्या बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बारामतीत क्रांतीदिनी आरपीआयचं धरणे आंदोलन

दौंड डेपोच्या एसटी बस वारंवार बंद पडत आहेत. मात्र, एसटीच्या अधिकाऱ्यांकडून याकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहेत. नादुरुस्त बस रस्त्यात बंद पडून दुर्घटना घडल्यास प्रवाशांचा जीवही जाऊ शकतो. सध्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग प्रवासासाठी लाल परीलाच प्राधान्य देतात. त्यामुळे एसटी महामंडळाने चांगल्या बस रस्त्यावर सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *