राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर! एकाच टप्प्यात निवडणूक

दिल्ली, 15 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. तसेच या निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पार पडेल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी (दि.15) केली. यासंदर्भात आयुक्त राजीव कुमार यांची आज दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

https://x.com/ANI/status/1846134482627170377?t=-X02HhTeijUQyg-PHVMTRQ&s=19

पहा निवडणुकीचा कार्यक्रम 

राज्यात यंदा एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्यास 22 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर असेल. तर विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. त्यामुळे याच दिवशी आपल्याला विधानसभा निवडणुकीचा निकाल कळणार आहे.

जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार

दरम्यान, महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीची तयारी जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोंबरपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडी मधील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. तसेच जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्याचे आव्हान देखील राजकीय पक्षांसमोर असणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील लढतींचे चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *