बारामती, 15 सप्टेंबरः बारामती तालुक्यातील नामांकित कारखान्यापैकी एक सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही वार्षिक सभा कारखाना कार्यस्थळावरील ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील प्रांगणात 29 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता पार पडणार आहे.
लम्पी आजारापेक्षा प्रतिबंध बरा
दरम्यान, गेल्या दोन वर्षात कोरोना काळात वार्षिक सभा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. दोन वर्षांनंतर ही सभा ऑफलाइन होणार आहे. यामुळे सदर वार्षिक सभेकडे सभासदांचे लक्ष आहे. या सभेत दहा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे.
बारामतीत संयुक्त कुष्ठरोग आणि क्षयरोग शोध मोहिमेला सुरुवात
शेतकी विभागाकडून अहवाल वाटप सुरू करण्यात आले आहे. सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर आणि कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी केले आहे.